Share this book with your friends

Aarsa Ani Mi / आरसा आणि मी Ek Selfie Manacha / एक सेल्फी मनाचा

Author Name: Varun Bhagwat | Format: Paperback | Genre : Self-Help | Other Details

हरवत चाललेल्या स्वसंवादाला उत्तर म्हणजे आरशासोबत गप्पा! ‘आरसा आणि मी’ मधील या गप्पा, प्रत्येकाच्या मनातील भावनांचं प्रतिनिधीत्त्व आहेत. यामध्ये शंभर संवाद आहेत जे वास्तवाची जाणीव करून देतात, कारण ‘आरसा’ फार स्पष्ट बोलतो, पण आशेचा किरणही दाखवतात कारण आरसा प्रेरणाही देतो. 

‘आरसा आणि मी’ म्हणजे संवादातून सांगितलेलं जगण्याचं सोपं तंत्र! 

संवाद किती मोठे किंवा लहान, यापेक्षा ते काय सांगतात हे अधिक महत्त्वाचं! त्यामुळेच हे पुस्तक एकदा वाचून ठेवून देण्यासारखं नाही. कारण स्वसंवाद सतत हवा.  

हे पुस्तक पहिल्यांदा सलग वाचावं जेणेकरून निराशेपासून आशेपर्यंतच्या प्रवासाची अनुभूती मिळत जाईल. नंतर हवं ते पान, हवा तो संवाद स्वयंप्रेरणेसाठी वाचत राहावा आणि ‘एक सेल्फी मनाचा’ घेत राहावा. 

Read More...

Sorry we are currently not available in your region.

Sorry we are currently not available in your region.

वरुण भागवत

वरुण भागवत हे २०१८ पासून सोशल प्लॅटफॉर्म वर स्फुटलेखन करत आहेत. २०२० साली त्यांनी मराठीमध्ये ‘शब्दमित्र’ या नावाने त्यांचा ब्लॉग सुरू केला. त्यानंतर त्यांची दोन ‘ई-पुस्तके’ (कॉफी आणि कॉर्पोरेट कथा, सिम्पल माणसांच्या सोप्या गोष्टी) अॅमेजॉन किंडल वर प्रकाशित झाली.

‘आरसा आणि मी- एक सेल्फी मनाचा’ हे पेपरबॅक आणि डिजिटल कॉपी अशा दोन्ही प्रकारातील त्यांचं पहिलं-वहिलं पुस्तक.

ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट- एम. बी. ए. मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे (२०१५-२०१७). ते स्वत: सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग देतात. ते पुण्यात राहतात. 

याचबरोबरीने वरुण हे अभिनेते म्हणूनही प्रसिद्ध आहेत. ‘ज्ञानेश्वर माउली’ या सोनी मराठीवरील गाजलेल्या मालिकेत प्रमुख भूमिका, अर्थात माऊलींची भूमिका त्यांनी साकारली. (२०२१-२०२३)

२०१० साली त्यांचा ‘अल्लाह के बंदे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यासाठी त्यांना स्टार स्क्रीन अवार्ड्स चं ‘बेस्ट अॅक्टर’ हे नामांकन प्राप्त झालं.

त्यांनी ‘अनबिटन’ या मराठी नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे.   

Read More...

Achievements

+1 more
View All